शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

व्हिडीओ : दिवाळीच्या पहाटे रंगले 'सूर निरागस'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 4:43 PM

दिवाळी पहाटेला लोकमत आयोजित राष्ट्रीय पुरस्कारविजेते प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या स्वरचैतन्य मैफलीत रसिकांना निरागस सूरांची अनुभूती मिळाली.

विश्वास मोरेपिंपरी : दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट अत्यंत विलक्षण आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाला. दिवाळी पहाटेला लोकमत आयोजित राष्ट्रीय पुरस्कारविजेते प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या स्वरचैतन्य मैफलीत रसिकांना निरागस सूरांची अनुभूती मिळाली.

चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या प्रांगणात लोकमत आयोजित युवराज ढमाले ग्रुप प्रस्तुत स्वरचैतन्य दिवाळी पहाट मैफल अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाचे प्रायोजक फिनोलेक्स पाईप, पीएनजी हे होते, तर सहयोगी प्रायोजक राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज, काका हलवाई हे होते. सहयोगी प्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को आॅप. सोसायटी, बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी हे होते.

प्रारंभी लोकमतचे संस्थापक-संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने मैफलीची सुरुवात झाली. मध्यांतरात कलावंतांचा सत्कार झाला. पहाटे तांबडं फुटण्याच्या वेळी गुलाबी थंडीत सुरांची मैफल सुरू झाली. मंचावर आकाशकंदील लावण्यात आले होते. तर मंचासमोर पणत्या पेटविल्या होत्या. हजारो दिव्यांनी परिसर उजळला होता. पहाटे पाचपासूनच रसिकांची मैदानावर गर्दी झाली होती. मैफल सुरू होण्याच्या वेळी मैदान रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. अशा आनंददायी आणि आल्हाददायी वातावरणात मैफलीची सुरुवात झाली. संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने घराघरांत पोहोचलेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायक महेश काळे यांच्या गायनाने मैफल अविस्मरणीय झाली. पुरुषोत्तम धांगुर्डे यांचे ते शिष्य असून, त्यांनी अनेक देशांत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार केला आहे. 

महेश काळे यांनी पूर्वार्धात शास्त्रीय गायन सादर केले. उत्तरार्धात नाट्यपदे सादर करून मैफल रंगतदार केली. ‘सूर निरागस हो....’ने मैफलीत बहार आणली. रसिकांनी अक्षरश: टाळ्या वाजवीत ताल धरला होता. ‘मोरया मोरया’ गजराने मोरयानगरीत आसमंत दणाणला. शास्त्रीय संगीतातील राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचनांचा फराळ शहरवासीयांना मिळाला. दोन तास सूरांच्या मैफलीची जादू चिंचवडकरांनी अनुभवली. तरुण-तरुणींची गर्दी लक्षणीय होती. सूरांच्या जादूगारांसमवेत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...’ या भैरवीने मैफलीचा कलसाध्याय गाठला. भैरवीने मैफलीची सांगता झाली. 

वैभव खांडोळकर (तबला), आेंकार दळवी (पखावज), राजीव तांबे (संवादिनी), राहूल गोळे (आर्गन) ची साथ केली. मध्यंतरात कलावंतांचा गौरव करण्यात आला. महापौर राहूल जाधव, मंगलाताई जाधव, महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, अजय गोखले, राणी पुळाबाई वुमन लॉ कॉलेजचे कोमल साळुंखे, अजय साळुंखे, लोकमान्य मल्टिपर्पज बँकेच्या सुजाता बर्वे, लोकमतचे शाखा व्यवस्थापक मयूर केमसे, उप मुख्य उपसंपादक हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

तरूणाईची अलोट गर्दीचिंचवड हा परिसर रसिक प्रिय असून महेश काळे यांच्या दिवाळीपहाट मैफलीस रसिकांची अलोट गर्दी झाली होती. रसिक मिळेल त्या ठिकाणी बसले होते. हजारो रसिक उभे राहून मैफलीची आनंद घेत होते. रसिकामध्ये लहानमुले, तरूण आणि ज्येष्ठांचाही समोवश मोठा होता. त्यावरून तरूणाईला काळे यांच्या गायनाची मोहीनी आहे, याची प्रचिती येत होती. सेल्फी घेण्यासही गर्दी झाली होती.  

तरूणाईशी संवादतरूणांईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महेश काळे यांनी तरूणाईशी संवाद साधला. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मोहीनी दिवसेंदिवस वाढत आहे, याब्द्द्दल समाधान व्यक्त केले. संगीत आणि मानवी मनाचे नाते विषद केले.

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेDiwaliदिवाळीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLokmat Eventलोकमत इव्हेंटLokmatलोकमत