पिंपळे गुरव येथे अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:55 IST2018-12-25T13:52:03+5:302018-12-25T13:55:06+5:30

शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली.

Disruption of vehicles by unknown criminals in Pimpale Gurav | पिंपळे गुरव येथे अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

पिंपळे गुरव येथे अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

ठळक मुद्देसहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशत

पिंपरी :  पिंपळे गुरव परिसरात ओंकार कॉलनी येथे अज्ञात आरोपीने रस्त्याच्याकडेला उभ्या केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात वाहनांची तोडफोड केली. पिंपरी-चिंचवडमध्ये गाडयांच्या तोडफोडीचे सत्र कायम आहे. शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी ओंकार कॉलनी मधील रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवली. धुडगूस घालत आरोपींनी  वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत

Web Title: Disruption of vehicles by unknown criminals in Pimpale Gurav