कुटुंबात वाद, विद्यार्थ्याने नदीत उडी मारून जीवन संपवलं; सांगवीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 21:26 IST2021-06-22T21:25:38+5:302021-06-22T21:26:18+5:30

गौरव याच्या कुटुंबियांमध्ये रविवारी सायंकाळी भांडण झाले. भांडणे होत असल्याचे गौरव याला आवडले नाही.

Dispute in the family, the student ended his life by jumping into the river; Incidents in the sangvi | कुटुंबात वाद, विद्यार्थ्याने नदीत उडी मारून जीवन संपवलं; सांगवीतील घटना

कुटुंबात वाद, विद्यार्थ्याने नदीत उडी मारून जीवन संपवलं; सांगवीतील घटना

पिंपरी : कुटुंबियांमध्ये भांडण झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी घरातून निघून गेला. त्यानंतर त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली. सांगवी येथे रविवारी (दि. २०) सायंकाळी ही घटना घडली.

गौरव ऊर्फ गोट्या रवींद्र शिंदे (वय २०, रा. पवनानगर गल्ली, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव आहे. गौरव याच्या कुटुंबियांमध्ये रविवारी सायंकाळी भांडण झाले. भांडणे होत असल्याचे गौरव याला आवडले नाही. त्यातून तो रागाने घरातून बाहेर पडला. सांगवी येथे त्याने पुलावरून नदीपात्रात उडी मारली. मात्र नदीपात्रात उडी मारलेला गौरव नसावा, असे म्हणून कुटुंबियांनी गौरव बेपत्ता असल्याबाबत सोमवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि. २२) दुपारी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

Web Title: Dispute in the family, the student ended his life by jumping into the river; Incidents in the sangvi