Pimpri Chinchwad: हिंजवडी-म्हाळुंगे रस्त्यालगत तोफगोळा सापडळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:39 PM2024-04-03T17:39:02+5:302024-04-03T17:39:50+5:30

माण हद्दीत तोफगोळा सापडळल्याने एकच खळबळ उडाली....

discovery of artillery shells along Hinjewadi-Mhalunge road pune latest news | Pimpri Chinchwad: हिंजवडी-म्हाळुंगे रस्त्यालगत तोफगोळा सापडळल्याने खळबळ

Pimpri Chinchwad: हिंजवडी-म्हाळुंगे रस्त्यालगत तोफगोळा सापडळल्याने खळबळ

हिंजवडी (पुणे) : हिंजवडी - म्हाळुंगे हायटेक सिटी रस्त्यालगत माण हद्दीत तोफगोळा सापडळल्याने एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले असून, खबरदारीसाठी पुढील कारवाई सुरु आहे.

दरम्यान, बुधवार (दि. ३) रोजी दुपारी एकच्या सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत माण म्हाळुंगे टाऊनशिप स्कीम ई - ३ कन्वर्ट साईट, पारखी वस्ती जवळ हिंजवडी म्हाळुंगे रस्तालगत पीएमआरडीकडून रस्त्याचे काम सुरू आहे. यावेळी खोदकाम करताना कामगारांना जुना तोफगोळा आढळून आला.

पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता किरण कोष्टी यांनी तत्काळ याबाबत हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बीडीडीएस पथकासमवेत पुढील कार्यवाही सुरु केल्याचे समजते.

Web Title: discovery of artillery shells along Hinjewadi-Mhalunge road pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.