गाडीची काच फोडून डायमंड, सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:43 IST2019-12-24T13:41:43+5:302019-12-24T13:43:07+5:30

दोन डायमंड व सोन्याच्या अंगठ्या, एक महागडे घड्याळ असलेली 65 हजारांची बॅग गाडीतून चोरट्यांनी लंपास केली.

Diamonds, gold rings looted from parked car | गाडीची काच फोडून डायमंड, सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

गाडीची काच फोडून डायमंड, सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

पिंपरी : लॉक करून पार्क केलेल्या चारचाकी वाहनाची चोरट्यांनी काच फोडली. दोन डायमंड व सोन्याच्या अंगठ्या, एक महागडे घड्याळ असलेली 65 हजारांची बॅग गाडीतून चोरट्यांनी लंपास केली. बावधन येथे रविवारी (दि. 22) रात्री पावणेआठ ते साडेनऊच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. 

याप्रकरणी प्रिया सुनील नेवघी (वय 29, रा. पाषाण रोड, बावधन, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नेवघी यांनी त्यांची चारचाकी बावधन येथे वडापावच्या एका कॅफेसमोर लॉक करून पार्क केली होती. त्यावेळी चोरट्यांनी गाडीची काच फोडली. दोन डायमंड व सोन्याच्या अंगठ्या, एक महागडे घड्याळ असलेली 65 हजारांची बॅग गाडीतून चोरट्यांनी लंपास केली. तसेच काच फोडून गाडीचे नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. ‍

Web Title: Diamonds, gold rings looted from parked car