डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:20 AM2018-09-12T01:20:52+5:302018-09-12T01:25:57+5:30

यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत.

Designer Bappa's growing crease, decorating with pearls, jewelery decoration | डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट

डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट

Next

रहाटणी : यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत. मूर्तीला सुबक रंगच नव्हे, तर मोत्यांच्या माळा, वेल्वेटचे धोतर, फेटा, आभूषणांनी सजविण्यात आले. असे ‘डिझायनर बाप्पा’ लक्ष वेधून घेत आहेत.
प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, शंखावरील गणरायाची मूर्ती, जय मल्हार, विठ्ठल अशा अनेक रूपांतील गणपती बाजारात आले आहेत. पूर्वी यावर पीओपीचे दागिने साकारलेले असतात; पण आता या मूर्तीवर मोत्यांचे दागिने घालण्यात येऊ लागले आहेत. पूर्वी शहरात काही कलाकार मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करून मोती, मणी चिकटवीत, पण आता मूर्तिकारांनीच मूर्तीला दागिने घालून सजविण्यास सुरुवात केली आहे. मूर्तीच्या रंगानुसार दागिने लावण्यात येत असल्याने मूर्ती आणखी उठावदार दिसत आहे.
याबाबत मूर्तिकार म्हणाले, ‘‘मूर्तीमधील रंगसंगतीमध्ये आम्ही आमूलाग्र बदल केला. गडद, चमकदार, उठावदार रंगांचा वापर करणे सुरू केले. त्यानंतर पीओपीच्या दागिन्यांनाही हुबेहूब बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला. अस्सल सोन्याचे दागिने फिके पडतील असे पीओपीचे दागिने बनविले जाऊ लागले. यंदा मूर्तीला वरून दागिन्याने मढविण्याचा ट्रेंड आला आहे. यास ‘डिझायनर बाप्पा’ असे म्हटले जात आहे.
मूर्तीच्या आकारानुसार लहान मोती, मोठे मोत्यांचे हार तयार करून ते घातले जात आहेत. मूर्तीच्या सोंडेलाही चमकणाऱ्या टिकल्या, स्टोनने सजविले जात आहे. गणरायाचे सोवळ्यातील धोतरही लाल किंवा पिवळ्या वेल्वेटच्या कापडाने तयार केले जात आहे. त्यास काठावर लेस लावली जात आहे. तसेच वेल्वेट इ. वस्त्रांनी पगडी तयार करण्यात आली आहे. त्यासही मोती, टिकल्या, स्टोनने सजविण्यात आले आहे. मुकुटही अशाच पद्धतीने सजवून आकर्षक करण्यात आला आहे.
गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाबद्दल एवढा उत्साह आहे की, आपल्या घरातील मूर्तीची आगाऊ नोंदणी केली जाऊ लागली आहे. मूर्तिकारांकडील २० टक्के मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली आहे. यात घरगुती मूर्ती खरेदी करणाºयांची संख्या अधिक आहे. डिझायनर गणपतीची किंमत ५०० ते ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. या किमतीतही मूर्ती खरेदी करणारे भाविक शहरात आहेत, याची प्रचिती मूर्तिकारांकडील आगाऊ नोंदणी पाहिल्यावर लक्षात येत आहे.
मूर्तींची आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी येणाºया ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे.
>पेणच्या गणपतीला मागणी
सध्या बाजारात गणपती विक्रीची दुकाने सजली आहेत. राज्यातून व राज्याबाहेरून अनेक गणपती विके्रते शहरात दाखल झाले आहेत. कोणी मातीचे, तर कोणी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे गणपती विक्रीस ठेवले आहेत. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र शाळेच्या मागच्या बाजूस गणपती विक्रीची शेकडो दुकाने सजली असली, तरी प्रत्येक भाविक पेणच्या गणपतीची मागणी करीत असल्याचे आढळून येत आहे. बाजारात काही मोजक्याच गणपती विक्रेत्यांकडे पेणचे गणपती मिळत असल्याचे काही विके्रत्यांनी सांगितले. खरे तर मातीचे गणपती हे महाग असल्याने अनेक नागरिक स्वस्तातील प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे गणपती घेत आहेत. हे जरी असले तरी भाविक इको फ्रेंडली गणपतीला जास्त पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक भाविक शाडू मातीचा गणपती आहे का, अशी विचारणा करताना स्टॉलवर दिसून येत आहेत.

Web Title: Designer Bappa's growing crease, decorating with pearls, jewelery decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.