शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला वारकऱ्यांनी देहूत गर्दी करू नये : कृष्ण प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 13:47 IST

तीर्थक्षेत्र देहुत ३० मार्चला बीज सोहळा आहे. मात्र सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे.

आळंदी : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला देहूनगरीत वारकऱ्यांनी तसेच भाविकांनी गर्दी न करता आपआपल्या भागात मोजक्याच  वारकऱ्यांत बीज सोहळा साजरा करून पोलिस व आरोग्य सेवा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालयाचेआयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली. 

तीर्थक्षेत्र देहुत ३० मार्चला बीज सोहळा आहे. मात्र सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. यापार्श्वभुमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी संप्रदायातील विविध वारकरी संस्थांचे पदाधिकारी, महाराज मंडळी व संप्रदायातील क्रियाशील मान्यवरांच्या समवेत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष सुसंवाद बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज गायकवाड, नरहरी महाराज चौधरी, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, माजी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, सचिव अजित वडगावकर मान्यवर उपस्थित होते.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, देहुत फार गर्दी झाल्यास आरोग्य सेवा व पोलिस प्रशासनावर ताण येईल. मात्र कोरोना महामारी वाढेल. यामुळे सर्वांच्या आरोग्याचे दृष्टीने वारकरी संप्रदायाने देहुत यात्रेला गर्दी करू नये. विशेष म्हणजे बंडातात्या कराडकरांनी संयमी भूमिका घ्यावी. शांततेला गालबोट लागेल असे विधान करू नये. नियमावली झुगारून सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय कोरोणाने बाधित होईल. संयम दाखवून तसेच शासनाचया नियमवलीत अधीन राहून हा सोहळा संपन्न होईल. बिजोत्सव सोहळा देखील वारकरी आणि नागरिकांनी घरी बसून साजरा करावा.

दरम्यान, वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, अखंड हरिनाम सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी केली. बैठकीचे सूत्रसंचालन संग्रामबापू भंडारे, प्रस्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तर धनवे महाराज यांनी आभार मानले. 

" राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर देहूत बीज सोहळा ५० वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षभर सर्व सण-  उत्सव तसेच आषाढीवारी देखील आपण मोजक्या वारकऱ्यांत साजरी केली आहे. तरीही शासनाची भुमिका मदत करण्याची आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांवर बधने आहेत. सर्वांचे सुरक्षिततेसाठी हे नियोजन असून कोणीही सुरक्षिततेच्या बाबतीत आडमुठी भुमिका घेऊ नये. - रामनाथ पोकळे, सहआयुक्त.

टॅग्स :pimpri-acपिंपरीdehuदेहूsant tukaramसंत तुकारामPoliceपोलिसcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या