शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण देशासाठी घातक -  शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 10:42 PM

भाजपा सरकारच्या काळात केवळ खासगी कंपन्यांमध्येच नव्हे, तर संरक्षण क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण होत आहे, ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणारी आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. 

पिंपरी : भाजपा सरकारच्या काळात केवळ खासगी कंपन्यांमध्येच नव्हे, तर संरक्षण क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण होत आहे, ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणारी आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. 

पिंपरीतील रहाटणी येथे भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने कामगार परिषद शनिवारी घेण्यात आली. या कामगार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशातील कामगार वर्गाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. केंद्र सरकारचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या पिंपरीतील एचएच्या कामगारांना गेल्या १५ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. सरकारतर्फे  निधी नाही, अशी सबब पुढे केली जाते़ एकीकडे असे सांगितले जात असताना पुतळे उभारण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उभा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारले जात आहे. महान नेत्यांच्या स्मारक उभारणीला विरोध नाही. मात्र स्मारक उभारणीसाठी जसा निधी उभा केला जातो. तशीच भूमिका सरकारने सार्वजनिक उद्योगांच्या पुनर्वसनाबाबत, कामगारांना नियमित वेतनासंदर्भात ठेवावी, असे या निमित्ताने नमूद करावे वाटते.’’ 

आमच्या सरकारच्या काळात हिंजवडी आयटी पार्क सुरू केले. या परिसराचे चित्र पालटले. अनेक तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळाल्या. त्यामध्ये महिलांचे प्रमाण चाळीस टक्के आहे. हे अभिमानाने सांगावे वाटते. कारखानदारी अडचणीत आल्यानंतर त्याची जबरदस्त किंमत पहिल्यांदा कारखान्यात घाम गाळणा-या कामगारांना मोजावी लागते. औद्योगिक क्षेत्रात कधी मेक इन इंडिया, तर स्किल इंडिया अशी नावे देऊन योजना आणल्या जात आहेत. मात्र या योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढण्यापेक्षा कामगारांना लाचार बनविले जात आहे. त्यांच्या जीवनात अस्थैर्य निर्माण केले जात आहे. कायद्याने संरक्षण देण्याची गेल्या अनेक वर्षाची स्वीकारलेली भूमिका या भाजपा सरकारने ठिसूळ केली आहे. कामगारांची संघटित शक्ती दुबळी केली जात आहे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करण्याचे धोरण भाजपा सरकारने अवलंबले आहे. कामगाराची चुलच पेटली जाणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ६० टक्के कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे यापुढे कामगारांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे. 

दाल मे कुछ काला है देशाच्या संरक्षणासाठी आयुध निर्माण करणाºया कारखान्यांमध्ये खागसीकरणाचा शिरकाव होत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या घटना रोजच घडत आहेत. अशा क्षेत्रात बाहेरील घटकांचा शिरकाव झाला, तर देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचणार आहे. ‘राफेल’ घोटाळ्याची चर्चा आहे. ५०० कोटींचे राफेल विमान १३०० कोटींना खरेदी करण्याचा घाट घातला. यशवंतराव चव्हाण ज्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्या वेळी त्यांनी नाशिक येथे मिग विमान निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. आपल्या देशात तयार झालेल्या मिग या लढाऊ विमानांचा उपयोग अनेकदा युद्धात करण्यात आला. आपल्या देशात लढाऊ विमान निर्मितीचे कारखाने असताना खासगी राफेल कंपनीकडून विमान खरेदीचा प्रयत्न झाला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयालासुद्धा याबाबतची माहिती द्यायची नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे दाल ‘मे कुछ काला है’ हे लक्षात येते, अशी टीका शरद पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड