नात्याला काळिमा: जन्मदात्याकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; थेरगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:42 IST2021-09-04T19:42:34+5:302021-09-04T19:42:55+5:30

नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक

Defamation of relationship: Sexual abuse of a minor girl by the father; Incident at Thergaon | नात्याला काळिमा: जन्मदात्याकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; थेरगाव येथील घटना

नात्याला काळिमा: जन्मदात्याकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; थेरगाव येथील घटना

पिंपरी : जन्मदात्या नराधम पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या या नराधम पित्याला पोलिसांनीअटक केली. थेरगाव येथे बुधवारी (दि. १) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 

पीडित १४ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या ४० वर्षीय नराधम पित्याला पोलिसांनीअटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे पती-पत्नी तर १४ वर्षीय पीडिता त्यांची मुलगी आहे. फिर्यादी महिला घरी नसताना आरोपी पीडित अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करीत असे. आरोपीने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी नराधम पित्याला अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी लुटमार करून जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Defamation of relationship: Sexual abuse of a minor girl by the father; Incident at Thergaon