पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे हिंजवडी येथे राहणाºया ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच आणखी पाच रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.सदर महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून ३ आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने तिला त्याच दिवशी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना बुधवारी (दि. १६) तिचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात २६० रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांपैैकी ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:04 IST