वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 20:17 IST2018-11-04T20:16:31+5:302018-11-04T20:17:32+5:30

नाणे मावळातील मौजे नेसावे गावामध्ये अवकाळी पावसात वीज पडून दोघा जणांचा जागीच मृत्यु झाला आहे.

death of two due to thunder shock | वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

कामशेत : नाणे मावळातील मौजे नेसावे गावामध्ये अवकाळी पावसात वीज पडून दोघा जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. यामध्ये शोभा अंकुश शिरसट ( वय अंदाजे ३०- ३२)  व खंडू धोंडू शिरसट (वय अंदाजे ५०-५५)( दोघे रा. नेसावे, मावळ ) यांचा जागीच मृत्यू झाला . 
      

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ( दि. ४ ) रोजी भात कापणीसाठी शोभा अंकुश शिरसट, अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट असे एकाच कुटुंबातील सदस्य  गेले होते. अंकुश मारुती शिरसट, मारुती रोंघु शिरसट हे शेतात भात रचत होते.तर यावेळी अचानक आलेल्या वळवाच्या पावसापासून बचाव व्हावा म्हणून शोभा अंकुश शिरसट ह्या वडाच्या झाडाच्या खाली उभ्या राहिल्या होत्या. यावेळी खंडू धोंडू शिरसट झाडाखाली बसले होते. यावेळी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्यामुळे शोभा अंकुश शिरसट व खंडू धोंडू शिरसट यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: death of two due to thunder shock