थेरगावमध्ये चारचाकी वाहनात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 10:25 IST2021-10-08T10:24:02+5:302021-10-08T10:25:38+5:30

पिंपरी : चारचाकी वाहनात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. थेरगाव येथील पदमजी पेपर ...

dead body was found in a four wheeler at thergaon | थेरगावमध्ये चारचाकी वाहनात आढळला मृतदेह

थेरगावमध्ये चारचाकी वाहनात आढळला मृतदेह

पिंपरी : चारचाकी वाहनात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. थेरगाव येथील पदमजी पेपर मिलसमोर गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

महेश लक्ष्मण पायगुडे (वय ४५, रा. गोखले वृंदावन, थेरगाव), असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यांच्या घरच्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र महेश बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही.

एका चारचाकी वाहनात गुरुवारी महेश पायगुडे यांचा मृतदेह आढळून आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महेशचा मृतदेह गाडीमध्ये असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महेश यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून, सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

Web Title: dead body was found in a four wheeler at thergaon