शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या वाहतूककोंडीने वडगावकर त्रस्त

By admin | Updated: July 10, 2015 01:42 IST

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात.

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. या बेशिस्त वाहनांमुळे रस्त्यावरून एसटी बस व एका वेळी दोन चारचाकी वाहने जाताना दैनंदिन वाहतूककोंडी निर्माण होत असल्याने वडगावकर त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात पंचायत समिती, तहसील, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, उपकोषागार, न्यायालय, कृषी, भात संशोधन केंद्र, सहायक निबंधक, पोलीस ठाणे, दवाखाने, बँक, शाळा, महाविद्यालय व बाजारापेठ असल्याने दैनंदिन हजारो नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करतात.मुख्य रस्त्यात दवाखाने, मंदिर, सहायक निबधंक, बँक व बाजारपेठ असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे मोठी वाहने समोर एका वेळी आल्यास वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीतून जीव मुठीत घेऊन विद्यार्थी, महिला व नागरिकांना ये-जा करावी लागते. वाहतूककोंडी झाल्यास पोलिसांना बोलवावे लागते. तेव्हा वाहतूक सुरळीत होते. गुरुवारी राजकीय पक्षांची आंदोलने होतात. आठवडे बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.मे २०१३मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण कारवाई करून जागा मोकळी केली आहे. त्या जागेत खासगी वाहने बेशिस्त उभी केली जात आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्ग ते पोलीस ठाणे रस्त्यात तहसील, भूमिअभिलेख, पोलीस ठाणे व पंचायत समिती ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर पंचायत समिती, दुय्यम निबंधक, पोस्ट, न्यायालय, बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केल्याने वाहतूककोंडी निर्माण होते. त्यातून किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी. स्वतंत्र वाहनस्थळ उभारावे. वडगाव शहरात वाहतूक नियत्रंण करण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशा मागण्या होत आहेत.(वार्ताहर)