बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:59 IST2019-12-29T15:58:17+5:302019-12-29T15:59:08+5:30
बेकायदेशीरपणे हाॅस्टेलमध्ये घुसून पिता - पुत्राला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे.

बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण
पिंपरी : बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये प्रवेश करून मुलगा आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत किशोर पंजाबी (वय २१, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विरेश बेबळकर (वय २५), महेश हाडमोडे (वय २६), विशाल लोहार (वय २८) आणि अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी अनिकेत यांच्या होस्टेलमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. अनिकेत यांच्या वडिलांना शिवीगाळ करून अनिकेत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अनिकेत जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल केला आहे.