Pimpri Chinchwad: डी मार्टचा तब्बल साडेतीन लाखांचा माल टेम्पोमधून चोरीला
By नारायण बडगुजर | Updated: July 20, 2022 14:16 IST2022-07-20T13:35:43+5:302022-07-20T14:16:55+5:30
टेम्पोचे सील तोडून टेम्पोतील डी मार्ट कंपनीसाठी आणलेले तीन लाख ४७ हजार २३ रुपयांचे खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्या

Pimpri Chinchwad: डी मार्टचा तब्बल साडेतीन लाखांचा माल टेम्पोमधून चोरीला
पिंपरी : डी मार्ट कंपनीसाठी माल आणलेल्या मालातील टेम्पोचे सील अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर टेम्पोमधील साडेतीन लाखांचा माल चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. १८) पहाटे कृष्णा नगर, चिंचवड येथे घडली.
विजय अरविंद पराडे (वय ४३, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. माळशिरस, सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. त्यांनी त्यांच्या टेम्पोमध्ये मोशी येथील डिमार्टसाठी माल आणला होता. टेम्पो सील स्वरूपात असताना तो त्यांनी स्पाईन रोडवरील ह़ॉस्पिटलच्या शेजारी उभा केला होता. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञाताने फिर्यादीच्या टेम्पोला उलटा टेम्पो लावला. फिर्यादीच्या टेम्पोचे सील तोडून टेम्पोतील डी मार्ट कंपनीसाठी आणलेले तीन लाख ४७ हजार २३ रुपयांचे खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.