कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू;भोसरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 14:58 IST2021-07-17T14:58:28+5:302021-07-17T14:58:38+5:30

एमआयडीसी भोसरीमधील विश्वेश्वर चौकात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने सायकलला धडक दिली.

Cyclist death in dumper accident; incident at Bhosari | कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू;भोसरी येथील घटना

कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू;भोसरी येथील घटना

पिंपरी : कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. विश्वेश्वर चौक, एमआयडीसी भोसरी येथे ४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी सव्वाआठला हा अपघात झाला होता. 

हनुमंत गुरूबाळप्पा हडपद (वय ५३), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. उमेश हनुमंत हडपद (वय २५, रा. रहाटणी, काळेवाडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कचरा वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मयत वडील हनुमंत त्यांच्या सायकलवरून ४ नोव्हेंबरला कामावर जात होते. त्यावेळी सकाळी सव्वाआठला एमआयडीसी भोसरीमधील विश्वेश्वर चौकात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने हनुमंत यांच्या सायकलला धडक दिली. त्यामध्ये हनुमंत यांचा मृत्यू झाला.

Web Title: Cyclist death in dumper accident; incident at Bhosari