क्रूरतेचा कळस गाठला! एका नराधमाने १६ वर्षीय मतिमंद मुलीवर केला लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:08 IST2021-05-06T13:07:47+5:302021-05-06T13:08:57+5:30

तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Cruelty culminates! A 16-year-old mentally retarded girl was sexually abused by a man | क्रूरतेचा कळस गाठला! एका नराधमाने १६ वर्षीय मतिमंद मुलीवर केला लैंगिक अत्याचार

क्रूरतेचा कळस गाठला! एका नराधमाने १६ वर्षीय मतिमंद मुलीवर केला लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देमुलगी मतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने जबरदस्ती केली

पिंपरी: एका नराधमाने क्रूरतेचा कळस गाठून सोळा वर्षीय मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली.  

१६ वर्षीय मतिमंद मुलीच्या आईने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक लक्ष्मण शिनगारे (वय २३, रा. भोसरी), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई आणि वडील घरी असताना तिला कशाचे तरी आमिष दाखवून आरोपी घेऊन गेला. त्यानंतर एका बिल्डिंगमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.  मुलगी मतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने जबरदस्ती केली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम तपास करत आहेत.

Web Title: Cruelty culminates! A 16-year-old mentally retarded girl was sexually abused by a man