पुण्यातील हिंजवडी परिसरात गुन्हेगाराचे प्लेक्स झळकले; पोलिसांची कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 21:29 IST2023-03-17T21:29:35+5:302023-03-17T21:29:53+5:30
निलेश घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील हिंजवडी परिसरात गुन्हेगाराचे प्लेक्स झळकले; पोलिसांची कडक कारवाई
पिपरी : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश घायवळ व इतर दोघांचे अनधिकृत फ्लेक्स हिंजवडी पोलीस स्टेशन हददीतील चांदणी चौकातील पाईपलाईन हायवे रोड लगत लावले होते. या प्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशन हददीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फ्लेक्स लावले होते. हिंजवडी पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालीका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांचे पथकाने संयुक्त कारवाई करून हे अनधिकृत फ्लेक्स काढुन टाकत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.