शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आठशे रुपयांसाठी मित्राचा खून करणारा अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 20:02 IST

गेल्या महिन्यात शिवशाही हॉटेल समोर व कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर रहाटणी येथे उभ्या बसमध्ये धारधार शस्त्राने वार केलेल्या रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

पिंपरी-चिंचवड : वाकड येथे हात उसने घेतलेले आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याच्या रागातून ड्रायव्हर मित्राचा खून करणाऱ्या मित्राला वाकड पोलिसांनी एका महिन्यानंतर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.अनिल श्रावण मोरे (वय ३९, रा. सायली पार्क रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय ३९, रा चिंबळी, खेड) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात शिवशाही हॉटेल समोर व कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर रहाटणी येथे उभ्या केलेल्या बसमध्ये धारधार शस्त्राने वार केलला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याबाबत वाकड ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकड तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक हरिष माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करत असताना सुतार काम करणारा मोरे हा मयताचा मित्र असून दोघेही व्यसनी आहेत. त्याचा खून झाल्यापासून मोरे गायब आहे व त्याचा फोनही लागत नाही, अशी माहिती पोलीस शिपाई शाम बाबा यांना मिळाली. त्यादिशेने तपास सुरू असतानाच कर्मचारी दादा पवार व धनराज किरणाळे यांना आरोपी बावधन येथील पीबीपी आयटी या शाळेत सुतार काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.   मयत पवन उर्फ अनिल आणि आरोपी अनिल मोरे हे एकमेकांचे मित्र होते. नेहमी एकत्र दारूचे व्यसन करत काही दिवसांपूर्वी मयत अनिल याने आरोपीकडून हात उसने आठशे रुपये आणि मोबाईल मधील मेमरी कार्ड घेतले होते. त्याने ते अनेकदा मागूनही अनिल सुतार ती परत देत नसल्याने तो वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेल्या बसमध्ये पटाशी या हत्याराने मोरे याने डोक्यावर, गालावर, मांडीवर वार करून त्याचा खून केल्याचे कबुल केले.    सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक हरिष माने, कर्मचारी दादा पवार, धनराज किरणाळे, सुरेश भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :wakadवाकडCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस