पैशांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 19:18 IST2020-01-08T19:17:35+5:302020-01-08T19:18:02+5:30

आरोपी यांनी फिर्यादी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली.

Crime registred against five members in laws family who tortured Married women for money | पैशांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

पैशांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

पिंपरी : विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तसेच त्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथे २०११ ते ७ जानेवारी २०२० या दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती गुणवंतराव पाटील (३६), सासू शकुंतला पाटील (वय ६०), दीर वसंतराव पाटील (वय ३२), नणंद धन्वंती शिंदे (वय ३८), नणंदेचे पती चंद्रकांत शिंदे (वय ४५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. विवाहितेला तिच्या मुलीपासून वेगळे ठेवले. मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या भावाला देखील फोनवरून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Crime registred against five members in laws family who tortured Married women for money