पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फोडली बीअरची बाटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:01 IST2025-10-08T10:00:35+5:302025-10-08T10:01:20+5:30
जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी रुपेश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फोडली बीअरची बाटली
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या डोक्यात बीअरची बाटली फोडली. ही घटना रविवारी (५ ऑक्टोबर) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली. रुपेश संजय सोनकडे (२५, पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार प्रीतम आदियाल (२८, पिंपळे गुरव) आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकात आल्यानंतर त्यांना संशयितानी अडवले.
जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी रुपेश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बीअरच्या बाटल्या रुपेश यांच्यात डोक्यात फोडून त्यांना जखमी केले.