पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 20:30 IST2021-08-03T20:30:24+5:302021-08-03T20:30:55+5:30

आरोपी सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत

Crime aganist Assistant Police Inspector in the case of rape on women | पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा 

पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन नांदायला नेतो म्हणत महिलेवर लैंगिक अत्याचार; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा 

पिंपरी : पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन तुला नांदायला घरी घेऊन जातो, असे खोटे सांगून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. शिवाजी बबन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत आहे. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. ०२) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२१ ते १५ जून २०२१ या कालावधीमध्ये शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे घडली.  आरोपी यांनी फिर्यादीसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन फिर्यादी यांना नांदायला घरी घेऊन न जाता पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतल्यानंतर तुला नांदायला घेऊन जातो, असे वारंवार खोटे बोलून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यांना शिवीगाळ करून बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच त्यांना वारंवार हाताने मारहाण केली. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime aganist Assistant Police Inspector in the case of rape on women