बालविवाहप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 13:20 IST2021-06-29T13:19:59+5:302021-06-29T13:20:32+5:30
सुसगाव येथील घटना; मुलीच्या वडिलांसहित पती, सासू यांच्यावर गुन्हा दाखल

बालविवाहप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस
पिंपरी: अल्पवयीन मुलीचा विवाह करून पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला. सूस येथे १० डिसेंबर २०२० ते २६ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचा पती, सासू आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सूसगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीने याप्रकरणी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे वडील, पती आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही वडिलांनी तिचा विवाह लावून दिला. विवाह करून पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून हिंजवडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.