महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:26 IST2020-01-03T16:25:41+5:302020-01-03T16:26:07+5:30

सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक केला छळ

Crime against husband for sexually assaulting women | महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

पिंपरी : शिवीगाळ व मारहाण करून सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच अनैसर्गिक अत्याचार करून पतीने लैंगिक छळ केला. चिखली येथे एप्रिल ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. 
याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद, भाचा आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारहाण करून वाईट वागणूक दिली. तसेच फियार्दी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने फिर्यादी यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Crime against husband for sexually assaulting women