पिंपरीत क्रेनच्या धडकेने पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 14:43 IST2020-02-23T14:41:29+5:302020-02-23T14:43:16+5:30

भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी येथे शनिवारी ही घटना घडली.

crane hits pedestrian ; he dies on the spot | पिंपरीत क्रेनच्या धडकेने पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पिंपरीत क्रेनच्या धडकेने पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पिंपरी : जेष्ठ नागरिकाला क्रेनने धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गांधीनगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. 

बबन केरू साळवे (वय ६०, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. सौरभ हिरालाल कुमार (रा. नेहरूनगर) असे क्रेनचालक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन बबन साळवे (वय ३५, रा. गांधीनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन साळवे यांचे वडील बबन साळवे गांधीनगर येथील सार्वजनिक शौचालयाकडून घराच्या दिशेने चालत जात होते. दरम्यान, ते रस्ता ओलांडत असताना आरोपी सौरभ कुमार चालवित असलेल्या के्रनने साळवे यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने साळवे यांचा मृत्यू झाला. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. त्यानंतर क्रेनचालक आरोपी सौरभ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार तपास करीत आहेत.

Web Title: crane hits pedestrian ; he dies on the spot