गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

By नारायण बडगुजर | Updated: December 18, 2023 20:31 IST2023-12-18T20:31:07+5:302023-12-18T20:31:42+5:30

कोयते हवेत फिरवून चौघांनी परिसरात दहशतही निर्माण केली

Coyote stabbing for cutting the car Two friends injured one arrested | गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

पिंपरी : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणासह त्याच्या मित्रावर काेयत्याने वार केले. यात दोघेही जखमी झाले. तसेच कोयते हवेत फिरवून चौघांनी परिसरात दहशत निर्माण केली. पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. १६) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

प्रेम अनिल कांबळे (१८, रा. गणेशनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १८) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोहेल अब्बास शेख (२०, रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) या संशयिताला अटक केली. त्याच्यासह विनोद शिरसाठ, ऋषी शिंदे, अथर्व चव्हाण या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून संशयितांनी फिर्यादी कांबळे यांना हाताने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने कांबळे यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच कांबळे यांचे मित्र किरण गायकवाड यांच्यावरही कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील कोयते हवेमध्ये फिरवून संशयितांनी परिसरामध्ये दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक गंगाधर ढगे तपास करीत आहेत.

Web Title: Coyote stabbing for cutting the car Two friends injured one arrested