पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 23:22 IST2020-04-22T23:21:18+5:302020-04-22T23:22:42+5:30

वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू पुण्यातील रुग्णाचा उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू

Corona's third victim death in Pimpri-Chinchwad city | पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

ठळक मुद्देबुधवारी तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून पुण्यातील गुलटेकडी भागातील रहिवाशी असलेल्या कोरोनाबधित 40 वर्ष वयाच्या महिलेचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  महिलेवर पिपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बारा दिवसांत शहरात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे.  दिनांक 9 एप्रिलला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी निगडीतील 62 वर्षीय  महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर आज वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे तिघांचा मृत्यु झाला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, 
पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पुण्यातील गुलटेकडी येथील महिलेला अ‍ॅडमिट केले होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. तर आज तीन जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. महिलांचे वय 40 आणि 45 असून पुरुषाचे वय 50 आहे. हे रुग्ण दापोडी, वाकड आणि गुलटेकडी येथील आहे.'
   

Web Title: Corona's third victim death in Pimpri-Chinchwad city