Corona virus : पिंपरीत अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारणार दोन हजार बेडचे कोविड केअर रूग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:03 PM2020-07-16T13:03:52+5:302020-07-16T13:04:31+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रूग्णांची संख्या आठ हजारवर

Corona virus : A two thousand bed covid care hospital will be set up at Annasaheb Magar Stadium in Pimpri | Corona virus : पिंपरीत अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारणार दोन हजार बेडचे कोविड केअर रूग्णालय

Corona virus : पिंपरीत अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारणार दोन हजार बेडचे कोविड केअर रूग्णालय

googlenewsNext
ठळक मुद्देवाढीव रूग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेचे नियोजन; कोविड सेंटरची उभारणी होणार

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. रूग्णवाढीचा आलेख लक्षात घेता नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयवर कोरोनाचे तात्पुरते रूग्णालय (कोविड केअर सेंटर) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या सल्लागार नियुक्तीच्या विषयास मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा आलेख वाढत आहे. आठ हजार रूग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे वाढीव रूग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेने नियोजन केले आहे. त्यानुसार कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहेत. नेहरूनगर येथे हे रूग्णालय मगर स्टेडियमची जागा सव्वा पाच एकर आहे. त्यावर कोविड केअर रूग्णालय उभारण्याचे नियोजन केले. यासाठी विद्युत कामासाठी एमईपी सिस्टीम सोलुशन्सला सल्लागार म्हणून नियुक्तीस स्थायी समितीने ऐनवेळी मंजुरी दिली आहे.रूग्णालयासाठी विद्युतीकरण करणे,जनरेटर बसविणे,अग्निप्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचे पंप, वॉटर हिटर, वॉटर प्युरिफ्रायर, अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविणे आदी कामासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या कामाच्या मोबदल्यात सल्लागारास केवळ एक रूपया मानधन दिले जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थान अधिकारी म्हणून ओमप्रकाश बहिवाल यांना दरमहा चाळीस हजार रुपये मानधनावर सहा महिन्यांसाठी नियुक्तीस मंजुरी दिली. कोविड केअर सेंटर व इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन सेंटरमधील रूग्ण व नागरिकांना  जेवण व नाश्ता दिला होता. त्यासाठी २५ लाख ४१ हजार ५४१ रूपयांच्या खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या सीएसआर एक्टिव्हिटी अंतर्गत श्रृतिका बाग मुंगी यांची कॉपोर्रेट सोशल वर्कर म्हणून सहा महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Web Title: Corona virus : A two thousand bed covid care hospital will be set up at Annasaheb Magar Stadium in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.