Corona virus : पिंपरी शहर पोलीस दलातील आणखी तीन पोलिसांना बाधा; आठ जण झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 20:38 IST2020-06-19T20:33:26+5:302020-06-19T20:38:39+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता १३

Corona virus : पिंपरी शहर पोलीस दलातील आणखी तीन पोलिसांना बाधा; आठ जण झाले कोरोनामुक्त
पिंपरी : शहर पोलीस दलातील आणखी तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबधित पोलिसांचा आकडा १३ झाला आहे. त्यातील आठ पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता १३ झाली आहे. त्यातील आठ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, ते कामावर रुजू देखील झाले आहेत. गुरुवारी एका पोलिसाचा तर शुक्रवारी सकाळी दोन पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले असून पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या पाच पोलिसांवर पिंपरी - चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत.