Corona virus : धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसालाही कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 09:15 PM2020-05-18T21:15:28+5:302020-05-18T21:16:30+5:30

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

Corona virus : Shocking! Police at Pimpri-Chinchwad Police Commissioner also Corona affected | Corona virus : धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसालाही कोरोनाची बाधा

Corona virus : धक्कादायक! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसालाही कोरोनाची बाधा

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वी विकासनगर येथील पोलिसाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता आयुक्तालय मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका सहायक फौजदारास कोरोनाची बाधा झाली आहे.
पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना वाढीचा वेग कमी आहे. पोलीस दलातही कोरोनाचा प्रादूर्भाव झाला आहे. १५ मे रोजी विकासनगर किवळे येथील राहणाऱ्या पोलिसाला कोरोनाची बाधा झाली होती. हा कर्मचारी पोलीस मुख्यालयात येऊन गेला होता. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलीसांची तपासणी केली. तसेच लक्षणे आढळणाऱ्या आणि न दिसून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. यामध्ये चिंचवड येथील मुख्यालयातील एक पोलीस पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी केली आहे.

Web Title: Corona virus : Shocking! Police at Pimpri-Chinchwad Police Commissioner also Corona affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.