Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, रविवारी दिवसभरात 65 नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 22:35 IST2020-06-07T22:35:10+5:302020-06-07T22:35:23+5:30
दिवसभरात १५८ जणांना डिस्चार्ज , दोघांचा बळी

Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, रविवारी दिवसभरात 65 नवीन रुग्ण
पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६८ वर गेली आहे. तर आज दिवसात एकच व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे. तर आनंदनगर आणि रमाबाई नगरातील दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. २७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात रविवारी दिवसभरात ६० जण तर पुण्यातील दोन असे एकुण ६२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३३ पुरुष तर २९ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेला एक जण पुण्यातील पवनानगर आणि दुसरा मुंबई येथील रहिवाशी आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, काळेवाडी, पिंपरीगाव, जुनी सांगवी, पाटीलनगर, चिखली, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दापोडी, फुलेनगर, पिंपरी, अजंठानगर, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर पुणे आणि मुंबई येथील एक रहिवाशी आहे.
झोपडपट्टीतील दोघांचा मृत्यू
आनंदनगर आणि रमाबाई नगरातील दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. आनंदनगर येथील ५८ वर्ष आणि रमबाईनगरातील ६० वर्षांच्या महिलेस महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले होते. त्या दोघांचा आज मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील १७ आणि पिंपरीतील १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील ४३८ आणि पुण्यातील ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
..............
१५८ जणांना डिस्चार्ज
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रविवारी १७७ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या २७९ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच २७० जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ५७९ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ४३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये दिघी विजयनगर येथील नागरिकांचा समावेश आहे.