Corona virus : पिंपरी शहरात दिवसभराच ९८ नवीन कोरोनाबाधित ; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११० वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 09:07 PM2020-06-12T21:07:58+5:302020-06-12T21:08:37+5:30

औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट

Corona virus : 98 new corona affected a day in Pimpri city ; The total number of patients is over 1,110 | Corona virus : पिंपरी शहरात दिवसभराच ९८ नवीन कोरोनाबाधित ; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११० वर 

Corona virus : पिंपरी शहरात दिवसभराच ९८ नवीन कोरोनाबाधित ; एकूण रुग्णसंख्या १ हजार ११० वर 

Next
ठळक मुद्देदिवसभरामध्ये २०८ जणांना डिस्चार्ज

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचे आणि अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही चांगले आहे. दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी ९८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११० वर गेली आहे. २९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका दिवसात २०८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात शुक्रवारी दिवसभरात ९८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ५६ पुरुष तर ४२ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जुनीसांगवी, अजंठानगर, आनंदनगर, कस्पटेवस्ती वाकड, जयराम नगर सांगवी, खंडोबामाळ भोसरी, थेरगाव, चिखली, गुलाबनगर दापोडी, सिद्धार्थनगर, नेहरूनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, भाटनगर, भीमनगर, भोसरी, चºहोली विजयनगर काळेवाडी,  दिघी मोरेवस्ती चिखली, अशोकनगर चिखली, पिंपळेसौदागर, नढेनगर काळेवाडी, पिंपळेगुरव, पोलीस कॉलनी वाकड येथील नागरिकांचा समावेश आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ५४४ आणि पुण्यातील ८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, सक्रीय रूग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत पुण्यातील १९ आणि पिंपरीतील १८ अशा एकुण ३७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
 ..............
२०८ जणांना डिस्चार्ज
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शुक्रवारी १९१ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या १९१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच १८१ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ७४४  जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये आनंदनगर, नेहरूनगर, सांगवी, इंदिरानगर, साईबाबानगर निगडी, वाकड, दापोडी, सदगुरू कॉलनी वाकड, रूपीनगर, पवारवस्ती दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, थरमॅक्स चौक चिंचवड, भारतमातानगर पिंपरी येथील नागरिकांचा समावेश आहे.

Web Title: Corona virus : 98 new corona affected a day in Pimpri city ; The total number of patients is over 1,110

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.