Corona update: पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १ हजार ७३ जणांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:49 IST2022-01-08T18:47:41+5:302022-01-08T18:49:49+5:30
शहरात सद्यस्थितीत ४ हजार १६५ सक्रिय रुग्ण...

Corona update: पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी १ हजार ७३ जणांना कोरोनाची बाधा
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत शनिवारी कोरोनाच्या नवीन १ हजार ७३ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. शनिवारी शहरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. परिणामी काही दिलासा मिळाला आहे.
शहरात दिवसभरात १० हजार २१२ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी ४३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. शहरात सद्यस्थितीत ४ हजार १६५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३७८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर ३ हजार ७८७ रूग्ण गृहवीलगिकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यँत २ लाख ८३ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४ हजार ५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.