The contractor burnt the worker due to demanding payment | संतापजनक ; कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने जाळले

संतापजनक ; कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने जाळले

पिंपरी :  कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे  हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वाकडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष विश्वनाथ साह (वय ३३, रा. लेबर कॅम्प, ताथवडे. मूळ रा. चकईनायत, ता. जि. वैशाली, बिहार) असे जखमी कामगाराचे नाव आहे.  मोहम्मद अन्वर झुमरातिया (वय ४०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), संतोषकुमार हरकराम (वय ३६, रा. वर्धमान कन्स्ट्रक्शन, ताथवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथील सर्व्हिस रोडच्या बाजूला एक बांधकाम साईट सुरू आहे.त्या साईटवर आरोपी मोहम्मद हा ठेकेदार, तर आरोपी संतोषकुमार फोरमन आहे.

साह हे ठेकेदाराकडे सेंट्रिंगचे काम करत होते. त्यांनी ठेकेदाराकडे कामाचे पैसे मागितले. वारंवार पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून ३ फेब्रवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास सुभाष यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर पेट्रोल ओतले. त्यानंतर माचीसच्या काडीने पेटवून दिले. त्यानंतर आरोपीच्या साथीदारांनी सुभाष यांना इंजेक्शन देऊन घडलेली हकीकत न सांगता खोटी हकीकत सांगण्यास भाग पाडले. जखमी सुभाष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: The contractor burnt the worker due to demanding payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.