शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

आयुक्तांचा स्पेन दौऱ्यातील ‘सेल्फी’ सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:50 AM

स्मार्ट सिटी योजना : भाजपा शहराध्यक्षांसह महापालिका पदाधिकारी व अधिकारी दौऱ्यावर; नागरिकांची टीकाटिप्पणी

पिंपरी : पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी स्पेन येथील बर्सिलोना येथील स्मार्ट सिटी परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. या दौ-यावरील उधळपट्टीमुळे विरोध झाला होता. मात्र, विरोध डावलून महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी दौºयावर गेले आहेत. या दौºयातील आयुक्तांचा सत्ताधाºयांशी अळीमिळी गुपचिळी हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयुक्तांना नेटीझननी ट्रोल केले आहे.

महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन दीडवर्ष होत आले. तरीही प्रत्यक्षात स्मार्ट सिटीतील प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झालेली नाहीत. मात्र, स्मार्ट सिटीतील परिषदेसाठी आतापर्यंत दुसºयांदा महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी दौ-यासाठी गेले. महापौरांना स्पेनमधील बार्सिलोना शहराकडून निमंत्रण आले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीतील सदस्य महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधीपक्षनेते दत्ता साने, सदस्य सचिन चिखले, प्रमोद कुटे,सह शहर अभियंता राजन पाटील, संगणक विभागप्रमुख नीळकंठ पोमण आदी सहभागी होणार होते. मात्र, महापौर वगळता सर्वजण दौºयात सहभागी झाले आहेत. तसेच आमदार लक्ष्मण जगताप हे स्वखर्चाने सहभागी झाले आहेत.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, म्हणाले, ‘‘आयुक्त हे भाजपाचे घरगडी आहेत, अशी टीका मी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचा हा पुरावा आहे. स्मार्ट सिटीबाबत दौरा करण्यास आमचा विरोध नाही. परंतु महापालिकेच्या खर्चाने कशाला दौरे करता. स्वखर्चाने करायला हवेत, अशा प्रकारचा सेल्फी म्हणजे अभ्यास दौरा की सहल असा पश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. स्मार्ट सिटीत नसणारे अनेक सदस्यही सहभागी झाले आहेत. स्मार्ट सिटीशिवाय अन्य लोक सहभागी होण्याची संधी दिली असती, तर आणखी नगरसेवकही सहभागी झाले असते. आयुक्तांचे वागणे बरे नव्हे.’’साहेब, हे वागणं बरं नव्हं!४स्मार्ट सिटीसाठी हा अभ्यास दौरा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महापालिकेकडे नागरिकांचा कररुपी जमा होणा-या पैशाची ही उधळपट्टी असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.दरम्यान, दौºयाविषयीचे एक छायाचित्र आज फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप,इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर सेल्फी घेत आहेत, हे छायाचित्र ट्रोल झाले आहे. त्यात भाजपा शहराध्यक्षासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी एकत्र आल्याबाबतही टीका होत आहे. ‘सर्व राजकारणी सारखेच, आयुक्तांची सत्ताधाºयांशी अळिमिळी, दौरा की सहल, आयुक्तांचे वागणे बरे नव्हे, अशी टीका झाली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरSelfieसेल्फी