Pimpri Chinchwad: ट्रकमधून पडून क्लीनरचा मृत्यू, काळेवाडी फाटा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 19:33 IST2023-07-14T19:32:41+5:302023-07-14T19:33:13+5:30

ही घटना १० जुलै रोजी सकाळी काळेवाडी फाटा, काळेवाडी येथे घडली....

Cleaner dies after falling from truck, incident at Kalewadi Phata pune crime news | Pimpri Chinchwad: ट्रकमधून पडून क्लीनरचा मृत्यू, काळेवाडी फाटा येथील घटना

Pimpri Chinchwad: ट्रकमधून पडून क्लीनरचा मृत्यू, काळेवाडी फाटा येथील घटना

पिंपरी : ट्रकवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा ट्रकमधून पडून मृत्यू झाला. ही घटना १० जुलै रोजी सकाळी काळेवाडी फाटा, काळेवाडी येथे घडली.

प्रकाश राजेंद्र ऊर्फ राजप्पा म्हेत्रे (वय ३५, रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नरेश राजप्पा म्हेत्रे (वय ३३, रा. कर्नाटक) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक लक्ष्मण गणपती म्हेत्रे (वय ४८, रा. कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ प्रकाश म्हेत्रे आणि आरोपी लक्ष्मण म्हेत्रे हे कर्नाटक येथून काळेवाडी येथे मार्बल फरशी घेऊन येत होते. ते काळेवाडी फाटा येथे आले असता प्रकाश म्हेत्रे हे ट्रकमधून पडले. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Cleaner dies after falling from truck, incident at Kalewadi Phata pune crime news