पिंपळे गुरव : धूलिवंदनानिमित्त एकत्र आलेल्या परप्रांतियांमध्ये वाद झाला. यातून हाणामारीचा प्रकार घडला. डोक्याला मार लागल्याने एकजण जखमी झाला. महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी ही घटना घडली.
शहरात वास्तव्यास असलेले सुमारे सहाशेहून अधिक परप्रांतीय नागरिक कुटुंबीयांसह उद्यानात एकत्र आले होते. यात काही नेपाळी नागरिकही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी होती. दरम्यान अज्ञात कारणावरून यामधील काही परप्रांतियांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. काहींनी मोबाइल फोनच्या स्टिकसारख्या वस्तूंचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. जुन्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, उद्यानालगतच्या पिंपळे गुरव पोलिस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गर्दी पांगविण्यात आली. भांडणात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. नेपाळमध्ये धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत, विशेषतः सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे अनेक नेपाळी बांधव वास्तव्यास आहेत. सणानिमित्त एकत्र येण्यासाठी ते उद्यानात जमले होते. त्यातील काहींनी मद्यप्राशन केले असावे, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हुल्लडबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
Web Summary : A fight broke out among migrants celebrating Holi in Pimple Gurav, injuring one. Police dispersed the crowd at Rajmata Jijau Udyan after reports of drinking and disturbances. Investigation underway.
Web Summary : पिंपले गुरव में होली मना रहे प्रवासियों के बीच लड़ाई हो गई, जिसमें एक व्यक्ति घायल हो गया। शराब पीने और अशांति की खबरों के बाद पुलिस ने राजमाता जिजाऊ उद्यान में भीड़ को तितर-बितर कर दिया। जांच जारी है।