शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
2
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
3
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
4
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
5
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
6
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
7
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
8
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
9
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
10
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
11
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
13
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
14
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
15
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
16
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
17
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
18
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
19
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
20
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

महापौरांच्या वॉर्डात नागरिक हैराण, मोशी कचरा डेपो, साथीच्या आजारांत वाढ, उघड्यावरही टाकला जातो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:34 AM

प्रभागात उघड्यावर कच-याचे ढीग, या ढिगातून येणारी दुर्गंधी यामुळे या परिसरात राहणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करूनही कार्यवाही होत नाही.

मोशी : प्रभागात उघड्यावर कच-याचे ढीग, या ढिगातून येणारी दुर्गंधी यामुळे या परिसरात राहणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करूनही कार्यवाही होत नाही. विशेषत: म्हणजे ही समस्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या महापौर नितीन काळजे यांच्या मोशी प्रभागातील वास्तव आहे.पिंपरी-चिंचवड शहरात १८ वर्षांपूर्वी मोशीचा समावेश झाला. मोशीचा विकास ज्या नियोजन पद्धतीने होणे अपेक्षित होता. मात्र, मोशीकरांच्या माथी संपूर्ण शहरातील कचरा डेपो मारण्यात आला. कच-यांवर संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, निवडणुकीच्या काळात आणाभाका घेऊन कच-याची समस्या सोडविण्याचे आश्वासन देणारे स्थानिक नगरसेवक व महापौर यांनी पुढे कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे मोशी येथील कचरा डेपोमुळे परिसरात घाणीचे सम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, असून लोकप्रतिनिधीप्रमाणे महापालिका प्रशासनाला याचे कसलेच गांभीर्य नाही.प्रक्रिया प्रकल्प बंद, विकासाला खीळशहरातील दैनंदिन कचरा या डेपोमध्ये आणून त्यावर प्रक्रि या करून विविध प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. त्यामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांनी कचरा डेपोचा विरोध मागे घेतला होता. मात्र,पालिका प्रशासनाकडून योग्य पद्धतीने कार्यवाही न झाल्याने प्रक्रिया प्रकल्प बंद पडले आहेत. शिवाय या डेपोला संरक्षक भिंतसुद्धा चारही बाजूंनी नसल्यामुळे मोकाट कुत्री डेपोजवळ जमा होतात. त्यानंतर बाहेरील शेतीचे नुकसान करत आहेत. मात्र, प्रशासनाने कचरा डेपोच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केलेले नाही.कचरा डेपोच्या दुर्गंधीने परिसरातील नव्याने उभारण्यात येणारे गृहप्रकल्प व विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे परिसराच्या विकासाला खीळ बसली आहे. नवीन प्रकल्प मालकांना कचरा डेपो डोकेदुखी ठरत आहे. शहरातील जवळपास ७५० मेट्रिक टन कचरा या डेपोमध्ये टाकून त्यावर प्रक्रि या करण्याचे नियोजन आहे. मात्र, पूर्वीचे प्रकल्प बंद असल्याने नवीन कचºयाला स्थानिकांचा विरोध आहे. सध्या ही दुर्गंधी मोशीतील बोºहाडेवाडी, पुणे-नाशिक हायवे, हजारे वस्ती, बनकर वस्ती, जांभूळ शेती परिसरात येऊ लागल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मोशीतील कचरा डेपोवर दैनंदिन ७५० मेट्रिक टनदिवसभरात आणून टाकला जातो. आणून टाकलेल्या कचºयापैकी ४५० मेट्रिक टन कचºयावर मॅकेनिकल कंपोस्ट,४० टन गांडूळ खत प्रकल्प, दीड ते दोन टन प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प उरलेल्या कचºयाचे सॅनिटरी लॅण्ड डेव्हलपर्सच्या माध्यमातून कचºयाची विल्हेवाट लावली जात असते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, राडा रोड्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प असे प्रकल्प यापुढे राबवण्यात येणार आहे.- संजय कुलकर्णी,कार्यकारी अभियंता,पर्यावरण

टॅग्स :Puneपुणे