शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची उतरविली नशा; ३८ मद्यपींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:00 PM

ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली.

ठळक मुद्दे१६ दुचाकी व एक रिक्षा चालकांवर मद्यपान करून वाहन चालविण्याचा भरला खटलाचिंचवडमधील विविध ठिकाणी उभारण्यात आले होते चेक पॉर्इंट

चिंचवड : ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हच्या विरोधात चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत दोन दिवसात ३८ मद्यपींवर कारवाई केली. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मद्यपान करून बेभान होत वाहने चालवितात. यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेत अशा वाहन चालकांची नशा उतरविली.चिंचवड मधील विविध चौकात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम राबविली. शनिवारी केलेल्या कारवाईत १६ दुचाकी व एक रिक्षा चालकांवर मद्यपान करून वाहन चालविण्याचा खटला भरला. रविवारी रात्री वाल्हेकरवाडी व थेरगाव पुलाजवळ नाका बंदी करून २१ दुचाकी व ४ चारचाकी वाहन चालकांवर कारवाई केली. नववर्षाच्या उत्साहात हुल्लडबाजी करून वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती.मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी चिंचवडमधील विविध ठिकाणी चेक पॉर्इंट उभारण्यात आले होते. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतरही मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात नाकाबंदी करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक यु. एन. लोंढे यांच्या सह कर्मचारी एस. बी. मगर, एस. डी. आफळे, टी. एस. महात, बी. ए. गायकवाड, जे. बी. भामरे, एफ. आर. इनामदार, एस. डी. म्हस्के यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड