Chinchwad By Election: चिंचवडमध्ये शंकर जगताप ठरले गेमचेंजर; भाजपच्या विजयाचे पडद्यामागील सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:57 AM2023-03-03T09:57:05+5:302023-03-03T10:00:01+5:30

अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी निर्णायक भूमिका...

Chinchwad By Election Shankar Jagtap became a game changer in Chinchwad; Behind-the-scenes mastermind behind bjp Ashwini Jagtap's win | Chinchwad By Election: चिंचवडमध्ये शंकर जगताप ठरले गेमचेंजर; भाजपच्या विजयाचे पडद्यामागील सूत्रधार

Chinchwad By Election: चिंचवडमध्ये शंकर जगताप ठरले गेमचेंजर; भाजपच्या विजयाचे पडद्यामागील सूत्रधार

googlenewsNext

पिंपरी : चिंचवडची उमेदवारी मिळविताना वहिनी की दीर अशी चर्चा रंगविली. त्यानंतर भाजपचा व मतदारांचा कौल घेऊन ऐनवेळी वहिनीच्या नावाला पसंती दिली. अन् त्यांना निवडून आणण्यासाठी निर्णायक भूमिका घेत पडद्यामागे सर्व सूत्रे फिरविल्याने शंकर जगताप हे गेमचेंजर ठरल्याची चर्चा आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सलग तीनवेळा चिंचवड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. लक्ष्मण जगताप हे पूर्णवेळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहत. मात्र, मागे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविणे. त्याचा महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे. हे सर्व शंकर जगताप हे पडद्यामागून करीत असत. कारण शंकर यांनीही काहीकाळ नगरसेवक म्हणून महापालिकेचा कारभार पाहिलेला आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या मागे शंकर हे भक्कमपणे उभे राहत असत.

दरम्यान, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघात भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली. शंकर जगताप यांनी न डगमगता नेतृत्व करण्याची तयारी दाखविली. मात्र, ऐनवेळी शंकर यांच्याऐवजी वहिनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला. परंतु, कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांनी संपूर्ण निवडणूक एकहाती घेऊन पडद्यामागील सूत्रे हलविली.

नेते अन् कार्यकर्त्यांशी समन्वय...

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर चिंचवडचा गड जगताप कुटुंबीय राखू शकणार नाही, अशी शंका भाजप व विरोधी पक्षांतील पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, शंकर जगताप यांनी बंधूच्या दु:खातून स्वत:ला व कुटुंबाला तर सावरले. पण भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय ठेवून चुरशीच्या निवडणुकीतही विजयश्री खेचून आणला.

गेल्या ३५ वर्षांत लक्ष्मण भाऊ यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने मतदानातून देत आदरांजली व्यक्त केली. तसेच, भाजप व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेविक व कार्यकर्त्यांनी भाऊंची उणीव जाणवू दिली नाही. त्यामुळे हा विजय भाजप व मतदारांचा आहे.

- शंकर जगताप, प्रमुख, चिंचवड विधानसभा, भाजप.

Web Title: Chinchwad By Election Shankar Jagtap became a game changer in Chinchwad; Behind-the-scenes mastermind behind bjp Ashwini Jagtap's win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.