Child's death in drowning in water tank at construction site | पाण्याच्या टाकीत बुडून बालिकेचा मृत्यू : बांधकाम ठेकेदाराविरूद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाण्याच्या टाकीत बुडून बालिकेचा मृत्यू : बांधकाम ठेकेदाराविरूद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : गणेशनगर, बोपखेल येथील बांधकाम साईटवर पाण्याच्या टाकीत पडल्याने ३ वर्षाच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी घडली असून या प्रकरणी सोमवारी बांधकाम ठेकेदाराविरूद्ध दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. रितु यादव असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. 


             गणेशनगर, बोपखेल येथे समर्थ रेसिडेन्सी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम ९० टक्के झाले आहे. त्या ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराने सुरक्षिततेची योग्य ती दक्षता घेतली नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. असे फिर्यादीने फिर्यादित नमूद केले आहे. त्यामुळे बांधकाम ठेकेदार मोहन पवार यांच्याविरूद्ध सुरक्षिततेच्या दक्षतेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर.एम.गिरी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Child's death in drowning in water tank at construction site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.