Accident | ट्रक-मोटारसायकलच्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:31 IST2023-02-22T20:31:01+5:302023-02-22T20:31:20+5:30

बालकाचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी...

child died in a collision between a motorcycle and a truck pune accident news | Accident | ट्रक-मोटारसायकलच्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू

Accident | ट्रक-मोटारसायकलच्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू

वडगाव मावळ (पुणे) : ट्रकला मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला तर वडील जखमी झाले. हा अपघात वडगाव तळेगाव फाट्यावर बुधवारी दुपारी झाला. कार्तिक ज्ञानेश्वर सुतार (वय ४) असे मृत बालकाचे नाव असून, ज्ञानेश्वर चिंतामण सुतार (वय २८, रा. कान्हे फाटा मूळगाव गारवडी, ता. खटाव) हे जखमी झाले.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुतार व त्यांचा मुलगा मोटारसायकल क्रमांक (१२ ईआर ९८५२) यावरून कान्हे फाटा येथून सोमाटणेकडे जात असताना ट्रक क्रमांक (एमएच १३ डीक्यू २९३३) याची जोरदार धडक बसली. चाकाखाली बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: child died in a collision between a motorcycle and a truck pune accident news