जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:01 IST2018-12-18T14:58:43+5:302018-12-18T15:01:36+5:30
दहशत माजवण्याच्या उद्देशाने हॉटेलात येऊन हॉटेलचालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : दहशत माजवण्याच्या उद्देशाने हॉटेलात येऊन हॉटेलचालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार परमानंद भोजवानी (वय ४९,रा. काळेवाडी) यांनी चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
दिपक दत्ताराम कदम (वय २६, श्रीनगर, रहाटणी), नितीन पोटे (वय २३, चिंचवड), तसेच एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा अश तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. फियार्दी भोजवानी यांचे दर्शननगरी इमारतीजवळ हॉटेल आहे. रविवारी रात्री ११ वाजता आरोपींनी हॉटेलचालक भोजवानी यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.