शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

हिंजवडीतील चक्राकार एकेरी वाहतुक कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 4:08 PM

नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे. 

ठळक मुद्देप्रायोगिक तत्वावरील बदलांतुन घेतला निर्णय आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, हिंजवडी ग्रामस्थांशी संवाद साधून तात्पुरते बदल

पिंपरी : आयटी नगरी म्हणुन जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या पुण्याजवळील हिंजवडीच्या वाहतुक कोंडीचा प्रश्न जटील झाला होता. पिंपरी चिंचवडला नव्याने झालेल्या पोलीस आयुक्तालयात रूजू झाल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी हिंजवडी, वाकड येथील वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यास प्राधान्य दिले. सप्टेंबरमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, हिंजवडी ग्रामस्थांशी संवाद साधून वाहतुक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले. चक्राकार एकेरी वाहतूक असाही प्रयोग केला. नागरिकांच्या सूचना, हरकती जाणून घेतल्या. या बदलामुळे वाहतुक कोंडी समस्या सोडविण्यास मोठ्या प्रमाणावर यश आले. त्यामुळे सप्टेबर मध्ये करण्यात आलेली चक्राकार एकेरी वाहतुक व्यवस्था आहे, तशीच यापुढेही ठेवण्याचा निर्णय वाहतुक विभागाने घेतला आहे. शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रो सर्कल फेज १ येथून उजवीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल चौक येथून वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल. शिवाजी चौकात येणाऱ्या आयटी कंपन्यांच्या बसगाड्या, तसेच इतर जड वाहने यांना वाकड पुलाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास, तसेच यू टर्न घेण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून पेट्रोल पंप चौकातून इच्छित स्थळी जाता येईल. जांभूळकर जीम, पेट्रोल पंपाजवळील आऊट मर्ज स्थानिकांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. इंडियन आॅईल पेट्रोल पंप ते शिवाजी चौक दरम्यान आऊट मर्ज, तसेच शिवाजी चौक  ते फेज १ सर्कल डिव्हायडर पंक्चर, फेज १ ते जॉमेट्रिक सर्कल दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर, मेझा ९ ते शिवाजी चौक दरम्यानचे डिव्हायडर पंक्चर बंद करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सूचना, हरकतीची दखल घेऊन चक्राकार एकेरी वाहतूक पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी कळविले आहे. भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज १ येथून सरळ पुढे जावे. मेझा ९ चौकातून वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. माणगाव रस्त्याने विप्रो सर्कल फेज २ चौकातून शिवाजी चौकाकडे सरकळ जाण्यास बंदी करण्यात आला आहे. सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल येथून इच्छित स्थळी जावे. फेज २, ३ कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रिक सर्कलच्या चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई केली आहे. वाहनांनी शिवाजी चौकातून जावे. असे परिपत्रक वाहतुक विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस