शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी नाना गायकवाडच्या मुलासह २८ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 3:46 PM

१५ फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला

पिंपरी : जमिनीचा बेकायदेशीर व बळजबरीने ताबा घेतला. या प्रकरणी २८ जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. काटेवस्ती, पिंपळे सौदागर येथे १५ फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

नरेश ठाकुरदास वाधवानी (वय ५५, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गणेश नानासाहेब गायकवाड (रा. औंध) याच्यासह खेमचंद उत्तमचंद भोजवानी (वय ५८, रा. वाकडेवाडी, पुणे) कन्हैयालाल होतचंद मातानी (६३, रा. साधू वासवानी गार्डन, पिंपरी) यांच्यासह अन्य २५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोजवानी आणि मतानी यांनी आरोपी गायकवाड याच्या मदतीने फिर्यादीच्या जमिनीवर अवैध ताबा मारला. त्या जमिनीवर बेकायदेशीर पत्रा शेड उभारून तेथील दुकाने भाडेतत्त्वावर दिली. यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न आरोपींनी स्वतःसाठी वापरून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत. 

गायकवाड पिता-पुत्रांचे कारनामे औंध येथील नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश यांचे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. संघटित गुन्हेगारी केल्याप्रकरणी या पिता-पुत्रावर मोक्कांतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतरही काही जणांकडून तक्रारी करण्यात येत असून, गायकवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गणेश गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpale guravपिंपळेगुरवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAundhऔंध