वेश्याव्यवसायपक्ररणी तळेगाव दाभाडेमध्ये तीन महिलांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:55 IST2022-06-03T12:54:44+5:302022-06-03T12:55:19+5:30

सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला...

Case filed against three women in Talegaon Dabhade for prostitution | वेश्याव्यवसायपक्ररणी तळेगाव दाभाडेमध्ये तीन महिलांवर गुन्हा दाखल

वेश्याव्यवसायपक्ररणी तळेगाव दाभाडेमध्ये तीन महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी : वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक शिष्टाचार सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लिंबफाटा चौक, तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. १) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.

सचिन संजिवन शिंदे (वय २९, रा. धानाेरी, विश्रांतवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारले. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून आरोपी महिलांनी सार्वजनिक शिष्टाचार सभ्यतेचा भंग होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Case filed against three women in Talegaon Dabhade for prostitution