कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 18:10 IST2019-01-12T18:09:33+5:302019-01-12T18:10:56+5:30

लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटार उभी केली असता दुसरया मोटारीतून आलेल्या चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळवून नेली.

car is stolen by threatening with weapon | कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली

कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली

पिंपरी : लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटार उभी केली असता दुसऱ्या मोटारीतून आलेल्या चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळवून नेली. ही घटना कासारवाडीतील नाशिकफाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास घडली. 

सोमेश्वर धोंडिबा काकडे (वय ३४, रा. काकडे निवास, विमलनाथ जैैन मंदीराजवळ, दिघीरोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काकडे हे नाशिकफाटा येथून सिल्व्हर रंगाच्या मोटारीतून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळी दुसरया एका सफेद रंगाच्या मोटारीतून चौघेजण त्याठिकाणी आले. मोटारीतून खाली उतरुन काकडे यांना कोयत्याचा धाक दाखवित त्यांची मोटार पळवून नेली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरु आहे.

Web Title: car is stolen by threatening with weapon