VIDEO | तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीत कार कोसळून भीषण अपघात; एकाच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:51 IST2022-05-27T11:43:22+5:302022-05-27T11:51:55+5:30

पहाटेच्या सुमारासची घटना..

Car crash in Indrayani river on Talegaon to Chakan road one person death | VIDEO | तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीत कार कोसळून भीषण अपघात; एकाच मृत्यू

VIDEO | तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंद्रायणी नदीत कार कोसळून भीषण अपघात; एकाच मृत्यू

तळेगाव दाभाडे: तळेगाव - चाकण रस्त्यावरील  इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात कार कोसळून झालेल्या अपघातात कारमधील एकास जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

संजय पुनमचंद बोरसे (वय ४३)  रा.मनोहरनगर ,तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मयत संजय बोरसे हे चाकण मधील एका कंपनीस कामास होते. चाकण बाजूकडून तळेगावच्या दिशेने कार
येत असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली.

एक कार नदीपात्रात पडली असून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची खबर शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, गणेश निसाळ, भास्कर माळी, अविनाश कार्ले, वैभव वाघ, मयूर दाभाडे, अनिश गराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार आणि मृतदेह सकाळी नऊच्या सुमारास नदीपात्राच्या बाहेर काढला. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Web Title: Car crash in Indrayani river on Talegaon to Chakan road one person death