घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसहित साहित्यही चोरले; एक लाखांच्या वस्तू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 15:40 IST2021-06-29T15:40:32+5:302021-06-29T15:40:38+5:30

देहूरोड येथे बुधवार ते रविवारच्या दरम्यान घडला हा प्रकार

The burglars also stole materials including gold and silver jewelery; One lakh worth of lamps | घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसहित साहित्यही चोरले; एक लाखांच्या वस्तू लंपास

घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसहित साहित्यही चोरले; एक लाखांच्या वस्तू लंपास

ठळक मुद्देसोन्या चांदीचे दागिने, २ ब्लॅंकेट, २२ साड्या असे सर्व चोरून नेले

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातून दागिने, साड्या आणि अन्य साहित्य, असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला. किवळे, देहूरोड येथे बुधवार ते रविवार दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला. 

आकाश विठ्ठल भांगरे (वय २९, रा. भिमाशंकर नगर, किवळे, देहूरोड) यांनी याबाबत सोमवारी (दि. २८) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगरे यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या चांदीचे दागिने, २ ब्लॅंकेट, २२ साड्या, असा एकूण एक लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

Web Title: The burglars also stole materials including gold and silver jewelery; One lakh worth of lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.