पिंपरीत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By नारायण बडगुजर | Updated: September 25, 2022 13:50 IST2022-09-25T13:50:10+5:302022-09-25T13:50:18+5:30

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद

Brutal murder of a young man in Pimpri by crushing him with a stone | पिंपरीत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरीत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरी : दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारमध्ये रविवारी (दि. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सागर कांबळे (वय २२, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी सागर कांबळे याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे सागर हा गंभीर जखमी होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागर याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निगडी आणि पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमध्ये आरोपी ‘कैद’ झाले आहेत. त्यानुसार, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. सागर कांबळे याचा आठवड्याभरापूर्वी मुलीला छेडल्याच्या कारणावरून एकाशी वाद झाला होता. त्यावेळी देखील काही जणांनी मिळून त्याला मारहाण केली होती.

Web Title: Brutal murder of a young man in Pimpri by crushing him with a stone